हेडा बंधू अटक होणार का ?
बेळगाव:
हेडा बंधूंनी बनावट कागदपत्रे जोडून काही ठिकाणी कामे मिळविल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून शहरात आहे.
कागदपत्रे बनावट आहेत की खरे, हे स्पष्ट होत नव्हते. जेव्हा ही प्रमाणपत्रे ज्या अधिकाऱ्याची सही असल्याचा दावा केला जातोय,त्यांच्या कार्यालयातच म्हणजे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानी बेळगाव खानापूर रोडवरील हेडा सिरॅमिक्समध्ये जाऊन माहिती घेतल्यानंतर या चर्चेत तथ्य असल्याचे कळाले.
पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक यांना स्पष्ट झाल्यानंतर, जिल्हा प्रशासन विठ्ठल हावन्नवर व सहकारी.आपल्याविरोधात तक्रार करण्याच्या तयारीत आहे, याची सुगाव आनंद व राधेश्याम या बंधूंना लागली होती. तेव्हापासूनच ते बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येते.
कर्नाटकात निविदा भरायची असल्यास गोवा,आसाम अथवा महाराष्ट्रातील अधिकाऱ्याचे अथवा तेथील वरिष्ठाचे पूर्णत्व प्रमाणपत्र तयार करून जोडायचे. तिकडे निविदा भरायची असल्यास
कर्नाटकातील अधिकाऱ्याच्या बनावट सहीचे पूर्णत्व प्रमाणपत्र जोडायचे, अशी क्लृप्ती या हेडा बंधूंकडून वापरली जात होती, असा संशय पोलिसांना आहे. ओरिसा येथेही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला असल्याचे सांगण्यात येते. अशाच प्रकारे अन्य राज्यांमध्येही एफआयआर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.