6.50 कोटी रु. खर्चून विविध प्रकारचे विकासकामांना आ. लक्ष्मी हेब्बालकर यांनी चालना दीली.
बेळगाव,
ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तरिहाळा गावात बुधवारी केपीसीसीचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांचा नेतृत्वाखाली ,आ. लक्ष्मी हेब्बालकर यांनी एकूण रु.6.50 कोटी खर्चाचा विकास कामाना चालना दिली .
१ कोटी रु.श्री रामलिंगेश्वर मंदिराची विकासासाठ,1.50 कोटी रुपये खर्चून गावात काँक्रीटचे रस्ते बांधणे सोबत पेव्हर बसविण्याचे काम आणि ४ कोटी रु.खर्चात मस्तमर्डी क्रॉस पासून तारिहाळा गावापर्यंतचा रस्ता विकास ,रस्ता रुंदीकरण व पथदिवे बसविणे ,कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
बडेकोल्ला मठाचे श्री सद्गुरु नागेंद्र स्वामी आणि अडविसिद्धेश्वर मठाचे श्री आडवेश्वर देव उपस्थित होते.कार्यक्रमात गावातील चन्नराजा, विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य चांनाराज हत्तीहोळी, अध्यक्ष, मंदिर विश्वस्त समिती सूर्याजी पा जाधव, यल्लाप्पा गौंडकर,प्रमोद जाधव, नामदेव जोगन्नवरा, नागप्पा तलवार, सविता कोळकारा, गंगाव्वा पुजारी, गीता तलवार, संगीता भुमन्नवरा, गीता मुखंडी,सावक्का नायक, श्री रामलिंगेश्वर देव सेवासंघ व गावातील लोक उपस्थित होते.