एल. ॲड टी. कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी: आ.अभय पाटील
बेळगाव : प्रतिनिधी
पाणी पुरवठा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली एल. अँड टी. कंपनीचा कारभार बेभरवशाचा असून या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी जोरदार मागणी आ. अभय पाटील यांनी विधानसभेत केली.
बेळगाव, हुबळी- धारवाड आणि गुलबर्गा शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यास एल. अँड टी. कंपनीला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या कालावधीत समस्या दूर न झाल्यास कंपनीवर सरकार कारवाई करेल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री बैरती बसवराज यांनी दिली.
आ. अभय पाटील यांनी सांगीतले की गेल्या दीड वर्षांपासून बेळगावात पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल. अँड टी. कंपनीला देण्यात आली आहे. तेंव्हापासूनच पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. कंपनीला दंड ठोठावूनदेखील कार्यपद्धती सुधारलेली नाही. त्यामुळे कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून पाणीपुरवठा मंडळालाकडे पूर्वीप्रमाणेच पुरवठ्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.