सुखकर्तामहिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात |
बेळगाव:
शहरातील सुखकर्ता काँलनी ९वा क्राँस भाग्य नगर येथील सुखकर्तामहिला मंडळच्यावतीने आयोजित तिळगुळ व हळदीकुंकू समारंभ नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहाने पार पडला.
सदर तिळगुळ व हळदीकुंकू समारंभानिमित्त महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात कॉलनी तील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या खेळानंतर महिलांना वाण वाटप करून समारंभाची सांगता करण्यात आली. समारंभ यशस्वी करण्यासाठी सिमा पाटील, प्रिया सायनेकर,वैष्णवी हलगेकर,सुनेत्रा रजपुत्,विनंती किल्लेकर,शोभा डोळेकरआदींनी विशेष परिश्रम घेतले.