बेळगावात कर वसुली मोहीम सुरू झाली…कामात हॉटेलला टाळे.

बेळगावात कर वसुली मोहीम सुरू झाली…कामात हॉटेलला टाळे.

बेलगाव :

महापालिकच्या महसूल विभागाने मालमत्ता व अन्य कर थकीत असलेल्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने वेळोवेळी नोटीसव्दारे सूचना देऊन देखील 11 लाख रुपयांचा थकित मालमत्ता कर न भरल्यामुळे शहरातील मारुती गल्ली येथील कामत रेस्टॉरंटला आज गुरुवारी सकाळी टाळे ठोकण्यात आले.

बेळगाव महापालिकेने थकीत कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून. या मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी सकाळी मारुती गल्लीत दाखल झालेल्या महापालिकेच्या महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने कामत रेस्टॉरंटने महसूल न भरल्याने कारवाई करून या रेस्टॉरंटला टाळे ठोकण्यात आले.

वेळोवेळी नोटीसीद्वारे सूचना करूनही 11 लाख रुपयांचा मालमत्ता कर न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेळगाव महापालिकेकडून कर वसुली अभियान अर्थात मोहीम उघडण्यात आली आहे.

तेंव्हा जनतेने आपला कोणत्याही प्रकारचा कर जर भरलेला नसेल तो तात्काळ भरावा. तुम्ही जितक्या लवकर कर भरा तितके ते तुमच्याही हिताचे तर आहेच शिवाय त्यामुळे कर जमा करण्याचे आमचे उद्दिष्टही लवकर पूर्ण होणार आहे.तरी कृपया सर्वांनी यासाठी सहकार्य करावे. आतापर्यंत आम्ही 100 टक्क्यांपैकी 62 टक्के कर वसुली केली आहे. उर्वरित कर वसुली आता येत्या एक दोन महिन्यात करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि येत्या आठवड्याभरात आपला थकीत कर भरावा, अन्यथा आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल.

सध्या आम्ही शहराच्या बाजारपेठेत थकीत कर वसुलीला प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित बिल कलेक्टर त्यांच्या प्रभागात कर वसुलीचे काम करत आहेत. या ठिकाणी सदर कामत रेस्टॉरंटचे 11 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे तसेच वेळोवेळी नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे या रेस्टॉरंटला आम्ही टाळे ठोकले आहे. त्यामुळे थकीत करदात्यांनी त्वरित कर न भरल्यास पुढील दिवसात या पद्धतीने आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. तेव्हा त्यांनी लवकरात लवकर कर भरावा, तसे महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post राणी कित्तूर चन्नमा उत्सवा अंतर्गत आज झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक
Next post ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಚನ್ನಮ್ಮನ ಮೂರ್ತಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ