सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळालेल्या अवस्थेत
चीक्कोडी
चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर गावाच्या हद्दीत संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गाजवळ एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आला.
चिक्कोडी येथील सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यापारी फैरोज बडगावी (४०, रा. मुल्ला प्लॉट) हे बुधवारी त्यांच्या कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून चालकाच्या सीटवर असलेला फैरोज पूर्णपणे जळाला असून सदर घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे
.