आ.अभय पाटील यांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन”अनोखा सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न 

आ.अभय पाटील यांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन”अनोखा सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न 

बेळगाव:

भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ कार्यक्रम चिंतामणराव शाळेच्या भव्य सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत विविध शाळांच्या 30 उत्कृष्ट शिक्षकांना प्रशस्तीपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 60 विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभय पाटील उपस्थित होते.

प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांताध्यक्षा स्वाती घोडेकर यांनी परिषदेचे राष्ट्रीय प्रकल्प, सामाजिक कार्य तसेच आगामी उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. प्रा. अरुणा नाईक यांनी “गुरुवंदना” कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. सुहास गुर्जर यांनी अतिथिंची ओळख करून दिली.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील यांनी, भारत विकास परिषदेच्या निःस्वार्थ सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सेवाकार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली व भावी आदर्श कार्यासाठी मन:पूर्वक सदिच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षकांना तसेच आदर्श विद्यार्थ्यांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. शुभांगी मिराशी यांनी कार्यक्रम संयोजन केले. जया नायक यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शहरातील सर्व प्रमुख शाळांचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये के. एल्. एस्. स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालय, बालिकादर्श विद्यालय, सरदार हायस्कूल, बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, ठळकवाडी हायस्कूल, एम् . व्ही. हेरवाडकर स्कूल, जी. जी. चिटणीस स्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, अमृता विद्यालय, संत मीरा इंग्लिश माध्यम स्कूल, महिला विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल, महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूल, व्ही. एम्. शानभाग हायस्कूल, एम्. आर. भंडारी स्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल, लिट्ल स्कॉलर्स हायस्कूल, गोमटेश मराठी माध्यम हायस्कूल, जोशी सेंट्रल स्कूल, माहेश्वरी अंधशाळा, मुक्तांगण विद्यालय, ज्ञान मंदिर इंग्लीश मिडीयम स्कूल, क्रां. संगोळी रायण्णा हायस्कूल, भारतीय विद्याभवन स्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल, सरस्वती हायस्कूल, चिंतामणराव हायस्कूल या शाळांमधून निवडलेले शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक तसेच सचिव के. व्ही. प्रभू, डी. वाय. पाटील, प्राचार्य व्ही. एन्. जोशी, डॉ. जे. जी. नाईक, एन्. बी. देशपांडे, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, सुहास गुर्जर, विजेंद्र गुडी, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, चंद्रशेखर इटी, पी. एम्. पाटील, गणपती भुजगुरव, विजय हिडदुग्गी, पी. जे. घाडी, ॲड. सचिन जवळी, विद्या इटी, प्रिया पाटील, ज्योती प्रभू, ज्योत्स्ना गिलबिले, निमंत्रित, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मुडा प्रकरण:मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरूद्ध बेळगावात भाजपचा निषेध मोर्चा..
Next post मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर चे विविध स्पर्धेत घवघवीत यश