मुडा प्रकरण:मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरूद्ध बेळगावात भाजपचा निषेध मोर्चा..
बेळगाव:
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बेळगावच्या चेन्नम्मा सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.
मुडा घोटाळ्याप्रकरणी सिद्धरामय्या यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या महानगर आणि ग्रामीण विभागाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.
सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी गोरगरिबांची जागा हडप केल्याने सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनाके, माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षा सुभाष पाटील, मुरगेंद्र गौडा पाटील, डॉ. सोनाली सरनोबत आणि इतर अनेकजण तिथे होते.