चिक्कोडी येथे तणाव वातावरण.
चिक्कोडी येथे तणाव वातावरण…
बेळगाव :
चिक्कोडी येथे काढण्यात आलेल्या ईदच्या मिरवणुकीत काही युवकांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला. हा प्रकार घडल्यानंतर वादावादी होऊन तणाव निर्माण झाला आहे.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाने सहा फूट उंच ध्वज फडकावला होता. या प्रकाराने नागरिकांतून नाराजी व्यक्त झाली तसेच त्याला आक्षेप घेण्यात आला. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ध्वज जप्त केला आहे.