त्वाकांदो स्पर्धेत समृद्दी पाटील हिची सुवर्ण कामगिरी
त्वाकांदो स्पर्धेत समृद्दी पाटील हिची सुवर्ण कामगिरी
नुकत्याच ११ ते १४ सप्टेंबर २०२४ दरम्यान तामिळनाडू येथील दिंडीगुल येथे पार पडलेल्याअस्मिता महिला द्वितीय टप्प्यातील त्वाकांदो स्पर्धेत समृद्दी शिवाजी पाटील हिने गोवा राज्यासाठी सुवर्णपदक जिंकले.
समृद्दी ही मुळची चन्नेवाडी ता.खानापूर येथील असून सद्या फोंडा गोवा येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ कबड्डीपट्टू शिवाजी पाटील यांची कन्या होय. या तिच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.