तवंदी घाटात अपघात : ट्रॅफिक जाम
बेळगाव :
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळ तवंदी घाटात दोन कंटेनर दोन कार आणि 2 दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे. मयातांचा आकडा देखील मोठा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान अपघात तवंदी घाटाच्या अमर हॉटेल जवळ वळणावर झाला आहे.
या अपघातात किती जण मयत झाले याची माहिती अद्याप मिळाली नसून आकडा चार पेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाला असून गेल्या दीड तासापासून वाहने अडकून पडली आहेत.
या अपघातात कंटेनर धडकेत कारचा दुचाकीचा चक्का चूर झाला आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे दरम्यान संकेश्वर निपाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला मयत किती आहेत याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.