बेळगाव मनपा आर्थिक संकटात! २७ रोजी होणार तातडीची बैठक
बेळगाव :
बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात जमीन गमावलेल्या बाधितांना कोट्यावधींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिल्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात नुकसान झालेल्या जमीन मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बजावले आहेत. बेळगाव महानगरपालिकेच्या आर्थिक प्रश्नाच्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेत २७ ऑगस्ट रोजी तातडीची बैठक होणार आहे. बेळगाव येथील छत्रपती शिवाजी उद्यानासमोरील शिवचरित्राच्या समोरील रस्त्याच्या कामामुळे बेळगाव येथील बी. टी. पाटील यांची जमीन गेली असून महानगरपालिकेने त्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, असा निकाल माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे. नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महापालिकेत विशेष सभा बोलावण्याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये बेळगाव येथील छत्रपती शिवाजी पार्कपुढील रस्त्याचे काम करण्यात आले होते, न्यायालयाने नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश दिल्याने महापौर आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.
शंकर पाटील म्हणाले की, बेळगावातील छत्रपती शिवाजी गार्डनच्या पुढे शिवचरित्र समोरील रस्त्याच्या बांधकामात ज्यांची जमीन गेली, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे आदेश पालिकेला प्राप्त झाले आहेत.