शहापूर येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव :
शहापूर येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कल्पना शंकर पाटील (वय ५१, रा. बसवण गल्ली, शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली.
कल्पना या दम्याच्या आजाराने त्रस्त होत्या. यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली होती. यातूनच त्यांनी बुधवारी मध्यरात्री ते सकाळी नऊच्या सुमारास आळवण गल्लीतील मराठी शाळा क्र. १९ येथील लोखंडी अँगलला नेसलेल्या साडीने गळफास घेतला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर ही माहिती शहापूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृत महिलेचा नातेवाईक विनायक महादेव पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांत नोंद झाली आहे. निरीक्षक एस. एस. सीमानी तपास करीत आहेत.