सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा प्रभारी सतीश जारकिहोली हेल्मेट घालून केली जनजागृती.
बेळगांव,-
बेळगावात झालेल्या जिल्हास्तरीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोली यांनी पोलीस विभागात आयोजित अभिनव हेल्मेट जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊन हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांना व आपल्या परिवाराला येणाऱ्या अडचण पासून सुरक्षित ठेवू शकतो असा संदेश दिला .
या कार्यक्रमात मंत्री सतिश जरकिहोली उत्तर आसिफ (राजू) सेठ कार्यक्रमा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना एक हजार हेल्मेटचे वाटप केले.
यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांनी हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगितले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त यदा मार्टिन मारबन्यांग जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भिमाशंकर गुलेडा, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. हेल्मेट जनजागृती कार्यक्रमात पोलीस विभागाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस सहभागी.
हेल्मेट वाटप कार्यक्रमानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा प्रभारी सतीश जारकिहोली, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भिमाशंकर गुलेडा यांनी बुलेट एअर हेल्मेट घालून शहरात फिरून हेल्मेट जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला.
जिल्हा स्टेडियम मधून जनजागृती रॅली सुरू, कृष्णा देवराया सर्कल, राणी चन्नम्मा सर्कल, कोर्ट रोड मार्गे क्रांतीवीर सांगोली रायण्णा सर्कल येथे पोहोचली.
***