आ.अभय पाटील यांचा झंझावाती सायकल दौरा ठरला लक्षवेधी
बेळगाव :
रविवार दिनांक 23 रोजी बेळगाव दक्षिण विभागातील आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून होत असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाची पाहणी केली. यावेळी अर्धवट स्थितीत असलेल्या कामकाजाची पाहणी करून आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुन्हा फैलावर घेतले.विविध ठिकाणी ,सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी वर्गाला सोबत घेऊन त्यांनी केलेला हा झंझावाती पाहणी दौरा लक्षवेधी ठरला.
वॉर्ड क्रमांक 54, 44, 30, 24 आणि 16 मध्ये सायकल भ्रमंतीचे आयोजन केले होते. यावेळी आ. अभय पाटील यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी, गॅस वाहिनी स्वच्छता, रस्ता, ड्रेनेज, गटार, पाणी पुरवठा, हेस्कॉन, स्मार्टसिटी आणि एल अँड टी चे संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच संबंधित वॉर्डातील नगरसेवक माधवी राघोचे, सारंग राघोचे , आनंद चव्हाण , नंदू मिरजकर, गिरीश धोंगडी नितीन जाधव राजू भातकांडे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.
एल अँड टी कंपनीच्या दिरंगाईमुळे लोक नाराज असून, एल अँड टीच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या मनपा सर्वसाधारण बैठकीत देखील आमदारांनी हा मुद्दा उपस्थित करत एल अँड टी कंपनीला मुदत दिली होती. एल अँड टी कंपनीने तातडीने सर्व कामकाज पूर्ण करावीत, असा इशारा आमदारांनी दिला.
अलीकडेच निर्माण केलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून काम अपूर्ण ठेवल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला होता. गॅस पाइपलाइन,, पाण्याची पाइपलाइन गळती यासारख्या समस्यांनी आमदारांचे लक्ष वेधले होते.
राणी चान्नम्मा नगर येथून या भ्रमंतीस प्रारंभ करण्यात आला. हिंदूनगर,राणी चन्नम्मा नगर 1 ला क्रॉस, गणेश मार्ग रोड, कृष्णा कॉलनी वसंतविहार कॉलनी,अर्जुन कॉलनी ,राघवेंद्र कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, विश्वकर्मा कॉलनी , डिफेन्स कॉलनी, शिवदीप कॉलनी , पार्वती नगर पोस्टल कॉलनी, लक्ष्मी नगर, नरगुंदकर कॉलनी गुरुप्रसाद नगर, भवानी नगर,कावेरी नगर ,तीलकवाडी ,चीदंबर नगर,शास्त्री नगर या भागात संचार करण्यात आला.