नीतीन ना.जाधव यांच्या तत्पार्थे मुळे वॉर्ड क्र .29 च्या नागरिकांत समाधान.
बेळगाव:
बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे काही मिनिटातच अनेक भागात रस्त्यावर पाणी आले. अनेक ठिकाणी रस्त्यावर दोन फूट पाणी साठले होते. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. अनेक घरात पाणी शिरले.
नगरसेवक नितीन ना जाधव यांनी आपल्या वॉर्ड क्रमांक 29 मध्ये पाहणी केले असता आज मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नागरिक त्यातूनच वाहने हाकत होते.
अपघाताची शक्यता लक्षात घेवून नितिन जाधव यांनी महानगर पालिका यांच्या कर्मचारी यांना घेऊन भर पावसात स्वता अभरून साचलेल्या ठिकाणी कचरा स्वच्छ करून घेतले आणि मार्ग खुला करुन घेतला .त्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले,