आ.अभय पाटील यांच्या हस्ते अखिल कर्नाटक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष अशोक हरणहल्ली यांचा सत्कार.
बेळगाव:
अखिल कर्नाटक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष अशोक हरणहल्ली यांचा आमदार अभय पाटील यांच्या हस्ते सत्कार दि.25 मे रोजी उद्यमबाग येथील सेलिब्रेशन हॉल येथे बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट तर्फे आयोजित सभेत करण्यात आला.
या वेळी बेळगाव अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष अशोक हरणहल्ली म्हणाले की, ब्राह्मणांचा सातत्याने अपमान करणाऱ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर संघटनेच्या दृष्टीने अधिक मजबूत होणे गरजेचे आहे.
बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट तर्फे आयोजित सभेत त्यांनी हा सन्मान स्वीकारला.काही विद्यापीठांमध्ये ब्राह्मणांच्या विरोधात संशोधनावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे आपण ब्राह्मण आहोत हे सांगायला लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. आपण सर्वांनी संघटित झालो तरच या सर्वांचा समर्थपणे सामना करून पुढे जाता येईल, असे हरणहल्ली म्हणाले.
ब्राह्मणांवर कितीही अत्याचार झाले तरी त्यांच्यात निषेध करण्याची ताकद नाही, अशी भावना आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर सामाजिक संघटने बरोबरच राजकीय दृष्ट्याही खंबीर होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ब्राह्मणांची मते आपल्याला असे गृहित धरणारे काही राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. मात्र सनातन धर्माचे रक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी ब्राह्मण समाज असल्याचे ते म्हणाले.
या वेळी आ अभय पाटील यांनी ब्राह्मण समाजाच्या बाजूने सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही यावेळी दिली.या वेळी आ.अभय पाटील यांच्या सोबत उद्योगपती भारत देशपांडे आणि इतर ब्राह्मण समाजाचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.