बस ओव्हरटेक करताना अपघात,4 जणांचा मृत्यू,15 हून अधिक जखमी
बस ओव्हरटेक करताना अपघात,4 जणांचा मृत्यू,15 हून अधिक जखमी
तामिळनाडू:
चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील मदुरंथकम येथे आज गुरुवारी पहाटे,बसचे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर 15 हून अधिक जखमी झाले. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पडलम पोलिसांनी दिली आहे.
ओव्हरटेक करताना बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस एका लॉरीला धडकली. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.