पंतप्रधान मोदींचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल .
वाराणसी:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी लोकसभा रिंगणातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल वाराणसी मतदारसंघात दाखल झाले आणि त्यांनी भव्य रोड शो केला. नंतर काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा केली.
आज वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर त्यांनी गंगास्नान केले, गंगा पूजन केले आणि गंगाआरती केली. नंतर त्यांनी भैरवेश्वर मंदिरात विशेष पूजा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज सादर केला.