बेळगाव: काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप, शहरातील शहापूर पोलीस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन...
बेळगाव :
शहरातील शहापूर भागात मतदारांना पैसे वाटणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार अभय पाटील आणि विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटागीमठ यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते व कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
पैसे वाटण्यारणा पोलिसांच्या ताब्यात देऊनही पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई होत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार अभय पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
पैसे वाटप करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप आमदार व महानगर महामंडळाच्या सदस्यांनी शहापूर पोलीस ठाण्यासमोर जमून केली.
पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास केलेल्या दिरंगाईवर आक्षेप घेत आमदार अभय पाटील यांनी तक्रार दाखल होईपर्यंत येथून हटणार नसल्याचे सांगितले.
स्थिरावला आहे. रात्री 11.40 वाजेपर्यंत आंदोलक स्टेशनवरच होते.