एस के ई सोसाइटीच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव

एस के ई सोसाइटीच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव:

जी एस एस पी यु कॉलेजच्या विद्यार्थ्यानी नुकत्याच झालेल्या बारावी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले, अशा गुणी विद्यार्थ्याचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या वेळी 20 गुणवंत विद्यार्थ्याना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले, या विशेष सोहळ्यास एस के ई सोसाइटीचे उपाध्यक्ष श्री सुधीर शानभाग, व्हाईस चेअरमन श्री एस वाय प्रभू श्री अशोक शानभाग, श्रीमती लता कित्तुर, श्री ग्यानेश कलघटगी प्राचार्य एस एन देसाई उपस्थित होते.

ओम कुलकर्णी, सुजल कणबर्गी, तीर्था एस, मृणाल पाटील, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वप्रयत्नाने आणि शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करणाग्रा विद्यार्थ्यास यश प्राप्त होतेच असे उद्गार व्यक्त केले.

विशेष प्राविण्य प्राप्त ओम कुलकर्णी, सुजल कणबर्गी, मणाली पाटील या विद्यार्थी वर्गाने महाविद्यालयामधील शिक्षणाच्या माध्यमातून हे यश प्राप्त केले, या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या विशेष कोचिंग क्लासेस किंवा मार्गदर्शनाचा आधार न घेता, कॉलेज शिक्षणचा आधारे यश प्राप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मोदींच्या कार्यक्रमाला एक लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती: भालचंद्र जरकिहोली.
Next post भाजप ही भारतातील नवीन ईस्ट इंडिया कंपनी : रणदीप सिंग सुरजेवाला