वंटमुरी महिलेला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका,फटाक्यांची आतषबाजी करून साजरा.
बेळगाव :
बेळगाव तालुक्यातील वंटामुरी गावात एका महिलेला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपी सुटले असून त्यांच्या समर्थकांनी स्वागत केल्याची घटना समोर आली आहे.
आरोपींना पोलिसांनी अटक केली. आता चार महिन्यांनंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर आरोपींचे पुष्पहार व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. एकूण 13 आरोपींना काकती पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात ठेवले होते. अखेर उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला.
सोमवारी रात्री आरोपींची कारागृहातून सुटका करण्यात आली. मुख्य आरोपी बसप्पा नेत्याला कारागृहासमोर पुष्पहार घालून मिठाई खाऊ घालण्यात आली. वंटमुरी येथे समर्थकांनी आरोपीचा मोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही.