महादेव पाटील बेळगाव लोकसभेसाठी समितीचे उमेदवार.

महादेव पाटील बेळगाव लोकसभेसाठी समितीचे उमेदवार.

बेळगाव :

बेळगाव लोकसभा मतदार संघातसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ नेते महादेव पाटील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव पाटील हे जुने जाणते व व सीमा लढ्याचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

बेळगाव लोकसभा मतदार संघातून समितीने आपला उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती त्यानुसार शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी संयुक्तिक बैठक घेऊन निवडणुकीची रीतसर घोषणा केली होती आणि निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 32 लोकांची कार्यकारणी देखील करण्यात आली होती.              महाराष्ट्र एकीकरण समितीकडे साधना पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, आनंद आपटेकर आणि महादेव पाटील अशी एकूण चार इच्छुकांचे अर्ज आले होते. 32 लोकांच्या कार्यकारिणीच्या सर्वानुमते महादेव पाटील यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भाजपच्या उमेदवारांना आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकवण्यासाठी रणनीती आखली जाणार आज.
Next post द्वितीय PUC निकाल घोषित…