उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याकडून टिळकवाडी विभागात प्रचाराला प्रारंभ

उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याकडून टिळकवाडी विभागात प्रचाराला प्रारंभ.

बेळगाव:

बेळगाव दक्षिण चे लोकप्रिय आमदार श्री अभय पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज बेळगाव महानगरपालिके चे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी टिळकवाडी वॉर्ड क्रमांक ४४ येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.

आज या प्रभागातील नेहरू रोड बूथ क्रमांक १३ येथे ३ बैठका घेण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना आनंद चव्हाण यांनी आज आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी केलेल्या अनेक विकास कामांचा आढावा सांगितला व भारतीय जनता पक्षाचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे अधीकृत उमेदवार श्री जगदीश शेट्टर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्णय सर्व टिळकवाडीतील नागरिकांनातर्फे घेण्यात आला.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख वसंत हेब्बाळकर, संगम कक्केरी, संजीव मारीहाल, अरुण कुलकर्णी, योगेश देशपांडे, संकेत कुलकर्णी, विष्णू पाटील, किशोर कालकुंद्रीकर व इतर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप
Next post हलगा – मच्छे बायपास कामाला पुन्हा स्थगिती..