गोंधळी गल्लीतील श्री. वेताळ देवस्थानचा वार्षिकोत्सव भक्तीभावात
सालाबादप्रमाणे गोंधळी गल्ली, बेळगाव येथील श्री वेताळ देवस्थानचा (थळजत्रा) वार्षिकोत्सव नुकताच भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडली.
गोंधळी गल्ली येथील श्री वेताळ देवस्थानाचा वार्षिक उत्सव गेल्या शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त सकाळी देवाची पूजा, अभिषेक, आरती वगैरे धार्मिक विधी पार पडल्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून मंदिरात शिंपणे वाटण्यात आले. त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता गोंधळी गल्लीतील ज्येष्ठ गोंधळी मिलिंद गोंधळी व त्यांच्या सहकाऱ्यांचा गोंधळाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्री वेताळ देवस्थानात आरती करण्यात आली त्यानंतर पुजारी गौतम माने यांनी सर्व नागरिकांच्यावतीने देवासमोर गाऱ्हाणे मांडून प्रार्थना केली. गाऱ्हाणे कार्यक्रमानंतर रात्री 9:30 वाजता वाजता प्रसादाचे वाटप करण्यात आले. गोंधळी गल्ली व परिसरातील असंख्य भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. वार्षिकोत्सव यशस्वी करण्यासाठी पुजारी गौतम माने, सागर माने, अजित माने, मनीष माने, दिलीप माने, शंकर पावशे, मारुती प्रभावळकर, बबन भोबे, सुरेश शिंदे, राजेश सावंत, राजू कुरणे, संजय सांगूकर आदींसह गोंधळी गल्लीतील युवा कार्यकर्ते व महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.