लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मूळ गाव कुटल : भाजपचा सवाल
बेळगाव: मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, ज्या बेळगावच्या ग्रामीण आमदार आहेत, त्या मूळच्या खानापुर तालुक्यातील आहेत आणि उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघात येतात. खानापूर तालुक्यातून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात स्थलांतरित होऊन बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून आमदार झाल्याचा पलटवार बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे.
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर हे हुबळीतून बेळगावात स्थलांतरित झाले आहेत, बेळगावात आपला पत्ता नाही या मंत्री हेब्बाळकरांच्या वक्तव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे, लक्ष्मी हेब्बाळकर खानापूरहून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने आल्या होत्या. जगदीश शेट्टर हे मोदी घराण्यातील आहेत. देशासाठी काम करणारे, सर्वत्र देशाची सेवा करतात. जगदीश शेट्टर हे बेळगाव लोकसभा मतदारसंघात अंदाजे 3 लाख मतांनी विजयी होतील.
शेट्टर यांच्याबाबत वक्तव्य करण्यापूर्वी मंत्री हेब्बाळकर यांनी काँग्रेस नेत्यांना न देता आपल्या मुलाला तिकीट का दिले, या प्रश्नाचे उत्तर द्यावे. काँग्रेसमध्येही अनेक ज्येष्ठ नेते आहेत. मात्र हेब्बाळकर यांच्या मुलाला तिकीट का दिले, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे शेट्टर यांच्याबाबत बोलण्याची नैतिकता नाही, असा हल्लाबोल धनंजय जाधव यांनी केला आहे.