श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त 10 एप्रिल रोजी बापट गल्ली येते विविध कार्यक्रम.
श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी बापट गल्ली, कडोळकर गल्ली येथील कार पार्किंग मध्ये श्री समर्थ संजीवन पादुका मंदिर मध्ये सकाळी नऊ वाजता अभिषेक पूजा व आरती होणार आहे.
तसेच दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती साडेबारा ते चार पर्यंत महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी आठ वाजता स्वामी समर्थांना फलाहार व आरती करून पूजा करण्यात येणार आहे.
तसेच रात्री नऊ वाजता श्री स्वामी समर्थां वरील ” तोचि एक समर्थ” हा चित्रपट सादर करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी मंदिराने आयोजित केलेल्या या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.