महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभेचे उमेदवार भरण्याची तारीख पुढील प्रमाणे
बेलगाम : –
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेला एक उमेदवार देण्यावर ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२४ पर्यंत रोज दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत रंगुबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येतील ही अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी मदन बामणे अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत २५ हजार रुपये वर्गणी व एक लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ पाटील होते, बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर, रणजित चव्हाण पाटील, एम.जी.पाटील, आणि इतर सर्व निवड समिती सदस्य उपस्थित होते.