*भाजप च्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतली आमदार अभय पाटील यांच्या संघटन कुशलतेची दखल..*
आमदार अभय पाटील यांना बेळगावमध्ये विकासपुरुष म्हणून ओळखले जाते तसेच भाजप मध्ये त्यांना एक कुशल संघटक म्हणून ओळखले जाते .
बागेवाडी सारख्या मतक्षेत्रात जिथे भाजप बी सुध्दा माहीत नव्हते तिथे संघटन करणं हे अशक्य मानलं जात असताना आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर एक बळकट संघटन बांधून अभय पाटील हे आमदार म्हणून तेथे निवडून आले. यानंतर बेळगाव दक्षिण मध्ये सुध्दा अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवत जनसामान्यांपर्यंत पोहचत अनेक आव्हानांना सामोरं जात आपलं संघटन त्यांनी मजबूत केलं .आमदार अभय पाटील हे जन संघापासून भारतीय जनता पक्षात आहेत आणि त्यांना एक शिस्तबद्ध नेता म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेऊन आमदार अभय पाटील यांना तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून घोषित करण्याचे भाजप चे महासचिव अरुण सिंह यांनी पत्राद्वारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कळविले आहे..
याआधी सुद्धा आमदार अभय पाटील यांच्यावर ,कर्नाटक महाराष्ट्र ,गोवा राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती ती त्यांनी अगदी योग्यरीत पार पाडली.