यक्षित युवा फाउंडेशन मार्फत “अन एस्कॅपेड अट दि वूड्स” साहस शिबिर संपन्न.
भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक, तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर राव यांच्या यक्षित युवा फाउंडेशनने २९ आणि ३० मार्च २०२५ रोजी कणकुंबीच्या जंगलात “ॲन एस्केपेड ॲट द वूड्स” या नावाचे दोन दिवसीय साहस शिबिर आयोजित केले होते, ज्यामध्ये ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी व्हॅली क्रॉसिंग, ट्रेकिंग, नाईट मार्च, टेंट पिचिंग, नाईट व्हिजिल आणि विशेष तायक्वांदो सराव सत्र सोबत इतर अनेक गिर्यारोहण क्रियाकलापांचा समावेश होत.
या उत्कंठावर्धक शिबिरात बेळगावच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे शिबिर भारतातील प्रसिद्ध साहसी तज्ज्ञ संजय जवळकर व त्यांचे पुत्र ऋषिकेश जावळकर यांचे मार्गदर्शनात घडला.
लिटिल स्कॉलर्स ॲकॅडमी येथील आरुष अभय टूमरी व स्तुती अभय टूमरी, बेन्सन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल यमनापूर येथील मोहम्मदशफी लतीफशाह चांदशाह व मोहम्मदसाहेब लतीफशाह चांदशाह, श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल कडोली येथील सान्वी सागर पाटील, सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल काकती येथील आयुष चंद्रशेखर सालुंके, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सोयरा प्रसाद घाडी, दीप शंकर पाटील, सानवी संदीप वासोजी, तन्वी इनुकुर्ती, अन्वी मेघन बागी आणि लिंगराज पदवी पूर्व कॉलेजातून त्रिवेणी बडकन्नावर ने हा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कॅम्प संपन्न झाल्यावर शिबिरार्थी ना भारतातील सुप्रसिद्ध एडवेंचरिस्ट आणि पर्वतारोहक ऋषिकेश जवळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आला.