महाद्वार रोड येथे २२४ लिटर गोवा बनावटीचे दारू जप्त.
बेळगाव :
बेळगाव येथील महाद्वार रोडवरील एका ठिकाणी साठवलेले २२४ लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. अबकारी खात्याने शनिवारी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
जुन्या पीबी रोडला लागून असलेल्या पाचवा क्रॉस महाद्वार रोड येथे एके ठिकाणी गोवा बनावटीचे मद्य साठवल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली.
अबकारीचे जिल्हा प्रमुख विजय हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन छापा टाकला असता येथे २२४ लिटर मद्य व १५ लिटर हुर्राक आढळून आली. ती जप्त करून मंजुनाथ मलगौडा गिडगेरी (वय २५, रा. पाचवा क्रॉस महाद्वार रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आणखी एक संशयिताचा शोध सुरू आहे.