
आमदार अभय पाटील यांच्याकडे महत्त्वाच्या जवाबदारी.
आमदार अभय पाटील यांच्याकडे महत्त्वाच्या जवाबदारी.
दिल्ली:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अनेकांवर जबाबदारीचे वाटप केले आहे.
भाजपने बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांना तेलंगणा निवडणुकीची प्रभरीची जबाबदारी दिले आहेत. खासदार नलीन कुमार कटील यांच्याकडे केरळचे प्रभारी आणि निर्मला कुमार सुराणा यांना महाराष्ट्र निवडणुकीच्या सह प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आमदार अभय पाटील यांनी यापूर्वी अनेक उत्तर भारतीय राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली आहे.