‘कार्पोरेशन जिम्नॅशियमच्या’ नव्या कार्यकारिणीची निवड
बेळगाव :
बेळगाव मधील कार्पोरेशन जिम्नॅशियम युवक मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली असून रविवारी झालेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कार्पोरेशन जिम्नॅशियम युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल आमरोळे, उपाध्यक्षपदी हेमंत हावळ, सेक्रेटरीपदी रमेश देसूरकर, उपसेक्रेटरीपदी गणेश देसाई, खजिनदारपदी प्रकाश वेर्णेकर, उपखजिनदारपदी महेश बामणे, कायदा सल्लागार ऍड. राम घोरपडे आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. यावेळी युवक मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.