होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 दिवस दारु विक्रीवर बंदी.
होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 दिवस दारु विक्रीवर बंदी.
बेळगाव:
होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 दिवस दारु विक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केली आहे.
रविवार 24 मार्च ते मंगळवार दि. 26 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत जिल्ह्यात बार, दारू दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कर्नाटक अबकारी कायदा अन्वये कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. बंदीच्या काळात दारु वाहतूक, साठवणे तसेच विक्री करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.