शेतकऱ्यांनी लोटांगण घालून केले सरकार विरोधात आंदोलन.
बेळगाव :
उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू केल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे लोटांगण घालून आंदोलन केले. आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी पोलीस प्रशासनाने, शेतकऱ्यांना लोटांगण घालण्यापासून थांबविले आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अडून राहिलेल्या शेतकऱ्यांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करत निवेदन दिले.
हलगा मच्छे बायपास रस्ता सुपीक जमिनीतून होत आहे यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वीपासूनच विरोध केला आहे. न्यायालयाने ही या कामाला स्थगिती दिली असताना दडपशाही करत हा रस्ता केला जात आहे.