खानापूर : खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे मनुष्य जातीला कलंक लावणारी घटना घडली असून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विष्णू कडोलकर (वय 38) व शीरील गुस्थीन लॉडरीग्स (42) या दोघा नराधमांना अटक करण्यात आली असून खानापूर पोलीस स्थानकात त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्या नराधमांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघा नराधमांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास खानापूर पोलीस ठाण्याचे, पी आय रामचंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस करत आहेत.