अथणी जवळ अवैध दारूचे बॉक्स जप्त.

अथणी जवळ अवैध दारूचे बॉक्स जप्त.

अथणी :

अथणी तालुक्यातील नांदगाव हद्दीतील कोडगनूर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले मद्याचे २० हून अधिक बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

अथणी पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवानंद कारजोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोडगनूर रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीने अवैधरित्या मद्याचे बॉक्स जमा केल्याची माहिती मिळाली होती

या प्रकरणी, नांदगाव येथील रवी शाबू याच्यावर अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिकारी अथणी पोलिस ठाण्यातील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आरोपी गस्ती (३३) याला अटक करण्यात आली आहे. अथणी पोलिस ठाण्याच्या कारवाईत डीवायएसपी श्रीपाद जलदे, सीपीआय रवींद्र नायकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवानंद कारजोळ कर्मचारी रमेश हादीमनी, श्रीधर बांगी, सिद्राम गाणींगेर, प्रकाश कुरी, परमानंद कांतीगोंडा यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मंत्री लक्ष्मी हेब्बळजर यांचे मुरगोडा महंता माठला भेट.
Next post पोक्सोअंतर्गत दोघांना अटक