बेळगाव :
जिल्हा प्रभारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शुक्रवारी (1 मार्च) भूमी संरक्षण योजनेंतर्गत जुन्या भूमी अभिलेखांच्या डिजिटलायझेशनचा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील तलाठी ऑफिस येथे जुन्या भूमी अभिलेखांच्या डिजिटायझेशनचा शुभारंभ करताना मंत्री म्हणाले की, जुन्या नोंदी जतन करण्यासाठी डिजिटायझेशन उपयुक्त ठरते.
ते म्हणाले की, कागदपत्रांच्या संरक्षणासोबतच जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन तात्काळ उपलब्ध होण्यासाठी आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी डिजिटायझेशनची प्रक्रिया आणि जुन्या नोंदी जतन करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी बेळगावचे (उत्तर) आमदार आसिफ (राजू) शेट, बेळगावचे तहसीलदार सिद्राय भोसगी आदी उपस्थित होते.