श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव 20 फेब्रुवारीपासून
बेळगाव -श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे श्री समादेवी जयंती उत्सव माघ शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी दरम्यान साजरी होणार आहे. मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सनई,चौघडा व काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ होणार असून. सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वेशभूषा श्लोक पठण व भाषण अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी सनई चौघडा व काकड आरती, त्यानंतर लक्ष पुष्परचंद व सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी सात वाजता माधव कुंटे यांचा राम गणेश गडकरी लिखित ठकीचे लग्न हा धमाल विनोदी कथाकथन कार्यक्रम संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी हा उत्सवाचा मुख्य दिवस असून सकाळी सनई चौघडा व काकड आरती नंतर श्रीला महाभिषेक व दुपारी 12 वाजता श्रीला मिष्टान्न व महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून ओटी भरण्यास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 4 ते 8 या वेळेत श्री ची पालखी प्रदक्षिणा होणार असून पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली गोंधळी गल्ली गवळी गल्ली नार्वेकर गल्ली व श्री समादेवी मंदिर अशी होणार आहेत. त्यानंतर रात्री पावणे व पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. यावेळी स्त्रीच्या भांडारातील देवीला परिधान केलेल्या साड्या खन व देवी समोरील श्री फळे तसेच देवी ला अर्पण केलेले फळ फळावर जाहीर रीतीने जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री समादेवी उत्सवानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडणार आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी उत्सवाचा शेवटचा दिवस असून सकाळी 6.30 ते 11 पर्यंत नवचंडीका होम संपन्न होणार आहे व दुपारी 12 ते 3 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.चार दिवस चालणाऱ्या या उत्सव कार्यक्रमांमध्ये समाजातील बंधू-भगिनी तसेच बेळगाव मधील सर्व भक्ताने बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे श्री समादेवी संस्थान वैष्यवाणी समाज यांच्यातर्फे करण्यात आले आहे.