आ.अभय पाटील यांच्या कल्पनेतून जनमलेला “उसाबरी कट्टा”

आ.अभय पाटील यांच्या कल्पनेतून जन्मलेला “उसाबरी कट्टा” .

बेळगाव:

आमदार अभय पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या “आउट ऑफ बॉक्स” विचारांसाठी ओळखले जातात.

अशीच एक कल्पना म्हणजे “उसाबरी कट्टा“. आज नेहरु रोड कॉर्नर आणि शिवाजी कॉलनी, टिलकवाडी येथे उसबर कट्ट्याच्या उद्घाटनावेळी अभय पाटील म्हणाले की, खेड्यापाड्यातील लोकांना संध्याकाळी मंदिरच्या कट्ट्यावर किंवा चवडीच्या कट्ट्यावर बसून चर्चा करण्याची आणि तणावातून मुक्त होण्याची संधी असते, पण आधुनिक जीवनशैलीमुळे काँक्रीटच्या जंगलात शेजारी राहूनही एकमेकांचा परिचय नसणाऱ्या, एकलकोंडेपणाचा सामना कराव्या लागणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणून चर्चा करून विरंगुळ्याचे चार क्षण निवांतपणे घालविता यावेत ही आमदार अभय पाटील यांची “उसाबरी कट्टा” ही संकल्पना बेळगावात आज प्रत्यक्षात साकारली..

 अशा लोकांसाठी अभय पाटील यांनी ‘उसाबारी कट्टा’ ही अनोखी कल्पना आणली आहे. अशा कल्पनांसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांकडून खूप मागणी आहे. त्यामुळे अभय पाटील यांनी सर्व दक्षिण बेळगाव प्रभागात वर्षभरात किमान एक ” उसाबरी कट्टा” बनवण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, विनायक धारवाडकर, उमेश सरदेशपांडे, श्रीकांत परुळेकर, प्रकाश भट, विनोद धबाले यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post  “आमदार आपल्या दारी” अंतर्गत, आ. अभय पाटील यांचा वॉर्ड क्र.54 मध्ये पाहणी दौरा.
Next post श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव 20 फेब्रुवारीपासून.