“आमदार आपल्या दारी” अंतर्गत, आ. अभय पाटील यांचा वॉर्ड क्र.54 मध्ये पाहणी दौरा.
बेळगाव : प्रतिनिधी
अनगोळ विभागात समस्यांच्या निवारणासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिली. सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासनच त्यांनी वॉर्ड क्र.54 येथे झंझावती सायकल दौरा केला.
वॉर्ड क्र. 55 मधील नागरिकांना जो समस्यांचा सामना करावा लागत आहे यासाठी सोमवारी सायकल फेरी करून आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आ. अभय पाटील यांनी दौरा केला.
यावेळी नागरिकांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी मनपा हेस्कॉम पाणीपुरवठा मंडळ अधिकारी वर्गाला आवश्यक सूचना करण्यात आल्या. या दौऱ्यामध्ये वॉर्ड क्र.54 मधील हिंदू नगर, रााणी चान्नमा नगर,कॉवरी नगर, भवानी नगर, गुरुप्रसाद नगर येथे पाहणी करण्यात आली. यावेळी या विभागातील कार्यकर्ते ,नगरसेवक आनंद चव्हाण, नंंदू मिरजकर,समाज सेवक सारंग राघोचे या सायकल फेरीत सहभागी झाले होते.