बसवण कुडची येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग.

बसवण कुडची येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग.

बेळगाव : तानाजी गल्ली बसवण कुडची येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घराला आज सकाळी 6 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.

परिसरातील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते. आगीत घरातील फ्रिज, कपडे, घराचे कागदपत्रे, खुर्ची, खाऊ पदार्थ सर्व जळून गेले आहे.

आग लागलेली समजताच नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी तातडीने त्यांची अशोक लक्ष्मनावर यांची भेट घेऊन झालेले नुकसान पाहणी करून त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले.

नगरसेवक बसवराज मोदगेकर आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच तलाठी नयना गौडा यांनीही फोन करून विचारपूस केली व तलाठी कार्यालयातून राजू पोनजी यांना घटनास्थळी पाठवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post क्षुल्लक वादातून कॅम्प येथे खून
Next post शाहूनगर येथे सराफी दुकानावर दरोड्याचा प्रयत्न