मुख्यमंत्री सिदधरामय्या उद्या बेळगावात
बेळगांव:
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उद्या 3 ऑक्टोबर रोजी बेळगाव दौरावर येत आहेत त्यांचा हा दौरा सुरळीत पार पाडावा याकरिता सकाळी सात वाजल्यापासून शहर परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात येणार असून हा बद्दल त्यांचा कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कायम असणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
उद्या नेहरू क्रीडांगणावर सकाळी धनगर समाजाचा भव्य अखिल भारतीय अधिवेशन आणि नववी वार्षिक राष्ट्रीय प्रतिनिधींचे अधिवेशन त्याचप्रमाणे राष्ट्रीय सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमांना खास उपस्थित राहण्याकरिता मुख्यमंत्री सिद्धारामय्या आहे बेळगाव मध्ये येणार आहेत.
त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे. त्याबद्दल कार्यक्रम संपण्यापर्यंत कायम असणार आहे कार्यक्रमाला कापती येथून नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला घेऊन येणारी वाहने राष्ट्रीय महामार्ग 48 मार्के निसर्गात हवास समोरील सर्विस रोड वरून श्रीनगर गार्डन शिवबाचा नगर रस्त्यावर लोकांना उतरवतील आणि तिथून परत निसर्ग धाबा केएलई छत्री हिंडाल को अंडर ब्रिज मार्गे हिंडाल्को मैदानावर जाऊन थांबतील.
त्याचप्रमाणे बागलकोट यरगट्टी या बाजूने येणाऱ्या नागरिकांकरिता कॅपिटल कल्याण मंडप मार्गे कॅपिटल पार्किंगच्या ठिकाणी येऊन थांबतील तर वेंगुर्ला सावंतवाडी सुळगा या बाजूने नागरिकांना घेऊन येणारी वाहने हिंडलगा फॉरेस्ट नाका बॉक्साइट रोड हिंगलगाव गांधी सर्कल पॉईंट रोड हनुमान रोड मार्गे नेहरूनगर रेडी भवन शेजारील मैदानावर येऊन थांबतील.
तसेच वेगवेगळ्या मार्गावरून येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या जवळच्या ठिकाणी वाहने लावण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.