टीकाकारांना राष्ट्रपती कडून चोख उत्तर
बेळगाव:
सीमावर्ती बेळगाव स्मार्ट सिटीबाबत नेहमीच काहीही बोलणाऱ्या ‘बुद्धिमान’ टीकाकारांना खुद्द राष्ट्रपती मुर्मू यांनीच उत्तर दिले आहे.
पूर्ण दक्षिण भारतात 50 स्मार्ट सिटी मध्ये बेळगांवला सर्वांगीण विकासाकरिता स्मार्ट सिटीचा पहिला पुरस्कार मिळाला आहे.
बेळगाव स्मार्ट सीटी चे काम निकृष्ट आहे, ‘स्मार्ट’ लोक वेगळे असतात, अशा पद्धतीने काही लोक बोलत होते . अशा असंतुष्टांना राष्ट्रपती यांनी उत्तर दिले आहेत. राष्ट्रपतींनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बेळगाव स्मार्ट सिटीचा पहिला पुरस्कार दिला.आमदार अभय पाटील म्हणाले की, स्मार्टा सीटी पुरस्काराने टीकाकारांना राष्ट्रपती यांनी उत्तर दिले आहेत.
बेळगावसह कर्नाटकातील तीन शहरांनी इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स स्पर्धेत (ISAC 2022) राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये 1 दशलक्ष लोकसंख्येखालील दक्षिण भारतीय शहरांमध्ये सर्वांगिण कामगिरीसाठी बेळगावला पुरस्कार देण्यात आला.