800 कोटींचे ड्रग्स जप्त, अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती
अहमदाबाद : गुजरात पोलिसांना अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी 80 कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी हे 80 किलोंचं कोकन जप्त केलं आहे. याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 800 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे
एनएआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी किनाऱ्यावरून 80 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 800 कोटी रुपये आहे. सुत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. यावेळी पोलिसांना समुद्रात लावारिसपणे अंमली पदार्थांची पाकीटे सापडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.