उभ्या असलेल्या बसला कारची धडक : चौघांचा मृत्यू

उभ्या असलेल्या बसला कारची धडक : चौघांचा मृत्यू

मंड्या :

मंड्या जिल्ह्यातील नागमंगल तालुक्यातील बेळ्ळूर क्रॉसजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केएसआरटीसी बसला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले.

हसनच्या बाजूने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केएसआरटीसी बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधील एक महिला आणि तीन पुरुष जागीच ठार झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच बेळ्ळूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. धडकेमुळे कारचा पुढील अर्धा भाग बसच्या आत घुसला गेला. बेळ्ळूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला. अपघातात मृत्युमुखी पडलेले बंगळुरू येथील असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज
Next post चार मुलांनी क्षुल्लक कारणावरून एका मुलाची हत्या केली.