पोलीस उपयुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांची केला सवांद

पोलीस उपयुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांची केला सवांद

बेळगाव:

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीसह संवेदनशील भागाची पाहणी केली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संवाद साधताना अनेक महत्वाच्या सूचना दिल्या,यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार कार्यध्यक्ष सुनील जाधव,आनंद आपटेकर, विनायक पवार अनंत बामणे सुधीर धामणेकरसह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. . यावेळी मार्केटचे एसीपी एन व्ही. बरमनी मार्केट पोलीस निरीक्षक एम के. धामनवर उपनिरीक्षक विठ्ठल, बिटचे नवीन कुमार, मलिकार्जुन गुजींकरसह आदी अधिकाऱ्यांनी त्यांना स्थानिकसह संवेदनशील भागाची माहिती दिली. पोलीस उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रोहन जगदीश अतिसंवेदनशील भागासह अन्य परिसरात भेटी देऊन बेळगावसंबंधी भौगोलिक व स्थानिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत उचगावच्या प्रणव गडकरीला कांस्यपदक
Next post आ. अभय पाटील यांचे प्रयत्नाला यश ! बेळगाव केबल कार प्रकल्पासाठी केंद्राकडून हिरवा कंदील…