राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत उचगावच्या प्रणव गडकरीला कांस्यपदक
बेळगाव (प्रतिनिधी) :
मुधोळ येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागातून 70 किलो वजन गटांमध्ये उचगावच्या कु. प्रणव राजू गडकरी यांने कांस्यपदकाचा मान मिळवला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रणव गडकरी हा उचगाव येथील कुस्तीपट्टू असून तो बेळगाव येथील महिला विद्यालय इंग्लिश माध्यम शाळेमध्ये शिकत असतो त्याने यापूर्वी अनेक ठिकाणी पारितोषिक मिळविलेली असून शालेय पातळीवरील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदीप्यमान यश मिळवुन अनेक पारितोषिके मिळविली आहेत.
तालुक्यामध्ये अनेक पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्येही त्यांनी अनेक पारितोषिक मिळवलेली आहे तो या भागातील एक नवीन होतकरू कुस्तीपटू तयार होत आहे. प्रणव गडकरीला प्रशिक्षक म्हणून मारुती घाडी आणि काशीराम पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कविता परमाणिक आणि क्रीडा शिक्षक विजय मल्ला आणि सुनील यांचेही मोलाचे प्रोत्साहन मिळालेले आहे. उचगाव येथील प्रगतशील शेतकरी राजू गडकरी यांचा तो चिरंजीव असून येथील उचगाव ग्रामपंचायत माजी अध्यक्ष नारायण गडकरी यांचा तो पुतण्या होय. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.