खानापूर येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

खानापूर येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू 

खानापूर :

नायको कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागून आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर (वय 65) यांचा पाय निकामी झाल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, माडीगुंजीहून खानापूरकडे येत असलेल्या आयशर ट्रकने नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागच्या बाजूने धडक दिल्याने आयशरमध्ये डाव्या बाजूला बसलेले संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर यांना अतिरक्तस्राव झाल्याने जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी खानापूर येथील सरकारी दवाखान्याकडे धाव घेतली. व स्वतः त्या ठिकाणी थांबून डॉक्टरना ताबडतोब उपचार करण्यास सांगितले. व नारायण कडोलकर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपयश आले.

या अपघातात आयशर मध्ये बसलेल्या वैभवी विठ्ठल मनोळकर (वय 41 ) संगरगाळी, व अझीत फिलीप लिमा (वय 45) संगरगाळी या दोघी महिला व फिलिप बस्ताव लिमा (वय 60) संगरगाळी व विठ्ठल शांताराम मनोळकर (वय 49) संगरगाळी हे दोघे नागरिक गंभीर जखमी झाले. चार जखमी पैकी तिघांवर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून, पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले. तर एका किरकोळ जखमीवर खानापुरात उपचार करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते दोन गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन
Next post राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत उचगावच्या प्रणव गडकरीला कांस्यपदक