बेळगाव शहरात शुक्रवारी वीज पुरवठा खंडित

बेळगाव शहरात शुक्रवारी वीज पुरवठा खंडित

बेळगाव : तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव आणि गणेशोत्सव सणाच्या दुरुस्तीच्या कारणास्तव शुक्रवारी (15) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

टिळकवाडी, मारुती गल्ली, हिंदवाडी, जक्कीर होंडा, एस. व्ही. कॉलनी, पाटील गल्ली, बेळगाव शहर, एमईएस, कॅम्प, नानावाडी, शहापुर आणि कपिलेश्वर रोड फीडर

येथून केला जाणारा वीज पुरवठा काही ठिकाणी खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

कॅन्टोन्मेंट फिडर कॅन्टोन्मेंट विद्युत केंद्रामधील – कॅम्प परिसरातील एम. एच. रोड, आर ए. लॉईन्स, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी व आदी भाग नानावाडी फिडर नानावाडी, नानावाडी – परिसर, आश्रयवाडी व आदी भाग

हिंदवाडी फिडर हिंदवाडी, गोवावेस, गुड्सशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवारपेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड व आदी भाग

मारुती गल्ली फिडर मारुती गल्ली, यंदे खुट सर्कल (धर्मवीर संभाजी महाराज चौक), किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली व आदि भाग

गोवावेस फिडर – गोवावेसपासून कॉलेज रोड, पै हॉटेल, केळकर बाग समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली व आदी भाग

टिळकवाडी फिडर – टिळकवाडी, काँग्रेस रोड, पहिला रेल्वेगट, दुसरा रेल्वेगेट, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस विहीर, लेले मैदान. व्हॅक्सिन डेम्पो, राणाप्रसाद रोड, हिंदूनगर, सावरकर रोड, एम. जी. रोड, नेहरू रोड, रायरोड, अगरकर रोड, शिवाजी रोड व आ भाग

शहापुर फिडर शहापूर, न्यू गुडसूशेड, शास्त्रीनगर, एस. पी. एम. रोड, कपिलेश्वर रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर, खडेबाजार. कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, गोवावेस व आदी भागातील वीजपुरवठा खंडित होणार.

पाटील गल्ली फिडर पाटील गल्ली, रेल्वेस्थानक, रेल्वे स्थानक रोड, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स व आदी भाग .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post विवेकानंद सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत 
Next post हिंदी भाषा ही हृदयाच्या कोशातून गोडवा घेऊन निघते :- डॉ. डी. एम. मुल्ला